Earthquake in MP: मध्यप्रदेशमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के | पुढारी

Earthquake in MP: मध्यप्रदेशमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन: दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या ६.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्र भूकंपानंतर आज (दि.२४) मध्यप्रदेशमध्ये देखील  सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake in MP) बसले. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वाल्हेर शहराच्या २८ किमी पूर्व-दक्षिण भागात, १० किमी खोलीवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

मणिपूरमध्ये देखील सौम्य भूकंपाचे धक्के

मणिपूरमधील मोइरांग येथे गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ६.५१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२१) संध्याकाळी राजधानी दिल्लीतही ६.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर बुधवारी(दि.२२) संध्याकाळीही दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

यापूर्वी दिल्ली देखील भूकंपाने हादरली

राजधानी दिल्लीसह एनसीआर, गाझियाबाद आणि चंदीगडच्या काही भागांत (Earthquake in Delhi-NCR)मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वादहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के सुमारे तीस सेकंदांपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबाद शहरात असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल नोंदली गेली असल्याची माहिती  भूकंप विज्ञान केंद्राने दिली  होती.

हेही वाचा:

Back to top button