भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश | पुढारी

भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘आयक्यू एअर’ या वायू प्रदूषणावर लक्ष ठेवणाऱ्या स्विस एजन्सीने जागतिक वायू गुणवत्ता अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये ३०,००० पेक्षा जास्त ग्राऊंड बेस मॉनिटर्सवरून १३१ देशांचा डेटा घेण्यात आला. या अहवालात जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १९ शहरे आशियातील आहेत. त्यापैकी १४ भारतीय शहरे आहेत. एक शहर आफ्रिकन देशाचे आहे.

भारत २०२२ मध्ये जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश होता. २०२१ मध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर होतो. वायू प्रदूषण मापन युनिट म्हणजेच पीएम २.५ मध्येही घट झाली आहे.

Back to top button