पुन्हा युती… या अफवांमध्ये तथ्‍य नाही : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन सगळ्या वाटा लोकसभा आणि विधानसभेकडेच जातात. मात्र तिकडे जाण्याच्या वाटा आता वेगवेगळ्या आहेत. त्‍यामुळे पुन्हा युतीबद्दल कोणी बोलत असेल, तर या अफवांमध्ये काही तथ्‍य नाही अशी भूमीका संजय राऊत यांनी मांडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं स्‍क्रिप्टेड भाषण होतं. आम्‍हाला अशा स्‍क्रिप्टची गरज नाही अशी टीका राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीप्रकरणी सुरत कोर्टाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यावर बोलताना राऊत यांनी यापुढे न्यायालय, ईडी, सीबीआय यांच्यावर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न उपस्‍थित केला. तसेच अशा परिस्‍थितही राहुल गांधी हे मागे हटलेले नाहीत, आम्‍ही सर्वजण त्‍यांच्यासोबत आहोत असे ते म्‍हणाले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी भाजपचा हा सर्व खटाटोप सुरू आहे. देशात तपास यंतणांचा दुरूपयोग केला जात आहे. हे सर्व जे होत आहे ते जनतेला माहित आहे. अमृत काळात देशात सूड आणि बदल्‍यांचं राजकारण सुरू आहे. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्‍याच निराकण झालं पाहिजे.

महाराष्‍ट्रात दंगली घडवायच्या आणि निवडणुका लढवायच्या यासाठी पडद्यापाठिमागून हालचाली सुरू आहेत. महाराष्‍ट्रात दंगली घडवण्याच कारस्‍थान रचलं जातंय अशी टीका त्‍यांनी केली. यावेळी शिंदे सेनेच्या दाद भूसेंवर त्‍यांनी टीका करताना दादा भूसेंनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. गिरणा कारखाण्यातील भ्रष्‍टाचार दादा भूसेंना पचणार नाही असे ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news