WhatsApp new feature: व्हॉट्सॲपचे येणार 'हे' भन्नाट फिचर; जाणून घ्या काय असेल खासियत? | पुढारी

WhatsApp new feature: व्हॉट्सॲपचे येणार 'हे' भन्नाट फिचर; जाणून घ्या काय असेल खासियत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा कंपनीची मालकी असलेले इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp हे यूजर्सच्या सोयींकरिता नेहमी नवीन अपडेट्स आणि फिचर्स (WhatsApp new feature) मार्केटमध्ये आणत असते.  व्हॉट्सॲपने नुकतेच एक भन्नाट फिचर मार्केटमध्ये आणले आहे. यामध्ये विंडोज डेस्कटॉपवरील व्हॉट्सॲप यूजर्ससाठी ग्रुप व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलचे फिचर लवकरच मार्केटमध्ये येणार असल्याचे कंपनीने ट्विटरच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे. .

Whatsapp ने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्या यूजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांना आता ग्रुप व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलचे फिचर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉलसाठी तुम्ही मोबाईल, डेस्कटॉप कम्प्युटर की लॅपटॉप वापरता (WhatsApp new feature) हे महत्त्वाचे नाही, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप अधिक वेगवान होणार असल्याचे संकेत यामधून मिळत आहेत.  ग्रुपमध्ये ॲडमिनची ताकद वाढवण्यासाठी नवीन सुरक्षा फीचर्स जारी केले असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

WhatsApp new feature: ‘ग्रुप व्हिडिओ कॉल’मध्‍येही सुधारणा

कंपनीने नवीन अपडेटसह ग्रुप कॉलमधील ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलमध्ये देखील सुधारणा केली आहे. डेस्कटॉप व्हॉट्सॲप यूजर्स आता ग्रुप कॉलमध्ये अधिकाधिक लोकांना आमंत्रित करू शकतात. मेटाच्या एका ब्लॉग पोस्टनुसार, विंडोजसाठी नवीन व्हॉट्सॲप डेस्कटॉप यूजर्संना ८ लोकांपर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तर ऑडिओ कॉलद्वारे ३२ लोकांपर्यंत पोहचता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

आगामी काळात या ग्रुप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलमध्ये अनेक बदल आणि सुधारणा केली जाऊ शकते. व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलसाठी लागणारी यूजर्सची मर्यादा देखील आगामी काळात आणखी वाढवली जाऊ शकते. जेणेकरून यूजर्स आपले मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांशी कनेक्ट राहू शकतील, असे कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button