WhatsApp ला दणका, ठोठावला ४८ कोटींचा दंड, 'हे' आहे कारण! | पुढारी

WhatsApp ला दणका, ठोठावला ४८ कोटींचा दंड, 'हे' आहे कारण!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) वर युरोपियन युनियनच्या गोपनियता कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी व्हॉट्सॲपला तब्बल ५५ लाख युरो (सुमारे ४८ कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई आयर्लंडमधील डेटा प्रायव्हसी कमिशनर (डीपीसी) कडून करण्यात आली आहे. डीपीसी ही युरोपीय युनियनमधील गोपनियता संबंधित नियमांवर देखरेख ठेवणारी मुख्य अथॉरिटी आहे.

डीपीसीने व्हॉट्सअॅपला त्यांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी वैयक्तिक डेटा कसा वापरला याचे पुनर्मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. या अथॉरिटीने मेटाचे इतर प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामलादेखील या महिन्यात असाच एक आदेश जारी केला होता. ज्यात म्हटले होते की मेटा पर्सनल डेटाचा वापर करुन ज्या पद्धतीने जाहिरातींना टार्गेट करते आहे त्याचे कायदेशीर आधारावर पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने व्हॉट्सॲपच्या एक प्रवक्त्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की ते या कारवाईविरोधात अपील करण्याबाबत विचार करत आहेत आणि त्यांची सेवा तांत्रिक आणि कायदेशीर अशी दोन्ही आधारावर चालते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

जगातील मोठ्या टेक कंपन्यांची युरोपातील मुख्यालये आयर्लंडमध्ये आहेत. यामुळे या कंपन्यांच्या गोपनियतेसंबंधित नियमांवर देखरेख ठेवणारी डेटा प्रायव्हेसी कमिश्नर (DTC) ही मुख्य अथॉरिटी आहे. त्यांनी WhatsApp ला सहा महिन्यांच्या आत त्यांचे प्रक्रिया ऑपरेशन्स नियमांच्या कक्षेत आणण्याचे निर्देश दिले आहेत. याआधीही डीटीसीने सप्टेंबर २०२१ मध्ये देखील गोपनियतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी WhatsApp ला २२.५ कोटींचा दंड ठोठावला होता. हा गोपनीय उल्लंघनाचा प्रकार मे २०१८ मध्ये झाला होता. व्हॉट्सअॅपने या कारवाईला कोर्टात आव्हान दिले होते.

हे ही वाचा :

Back to top button