

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसातील सततच्या पडझडीनंतर मंगळवारी शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना दिलासा दिला. सेन्सेक्स ४४५.७३ अंकांनी वधारत ५८०७४.६८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी १७.१०७.५० अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेत, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्याने देशातंर्गत शेअर बाजाराने आज (दि. २१) तेजी अनुभवली. आठवड्यातील दुसर्या दिवसाच्या व्यवहाराच्या सुरुवातील सेन्सेक्स २१४.४७ अकांनी वाढून ५७,९०० खुला झाला तर निफ्टी ५०६९.३० अंकांनी वाढून १७०५० च्या पार गेला. (Share Market Closing Bell)
सोमवार दि. २० मार्च रोजी शेअर बाजारात बहुतेक काळ घसरणीचे वर्चस्व दिसले. सोमवारी सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरत ५७ , ६२८.९५ वर तर निफ्टी १११ अंकांनी घसरत १६९८८ वर बंद झाला होता. मात्र आज शेअर बाजाराने तेजी अनुभवली. अदानी एंटरप्रायझेस, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ, रिलायन्स आणि लार्सन अँड टुब्रो शेअर्सला सर्वाधिक पसंती दिसली. तर जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक यांनी घसरण अनुभवली.
लाइफ इन्शुरन्स कंपनी इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनीला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून निधी उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर आणण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. या इश्यूमध्ये ५०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि प्रवर्तक आणि भागधारकांकडून 14.1 कोटी इक्विटी शेअर्सचा ऑफर-फॉर-सेल (OFS) समावेश असेल. विमा कंपनीची मालकी भारतातील सर्वात मोठ्या PSU बँकांपैकी दोन बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मालकीची आहे. याव्यतिरिक्त, वॉरबर्ग पिंकस द्वारा व्यवस्थापित खाजगी इक्विटी फंडांच्या मालकीच्या कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट्स इंडियाने जीवन विमा फर्ममध्ये भागभांडवल विकत घेतले आहे.
अदानी समूहाला गुजरातमधील मुंद्रा येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी निधी पुढील सहा महिन्यांत उभारला जाण्याची अपेक्षा आहे, त्यांनी हा उपक्रम रखडल्याच्या वृत्ताचे खंडन केले. "M/S Mundra Petrochemicals Limited (MPL) च्या ग्रीन PVC प्रकल्पाचे आर्थिक क्लोजर वित्तीय संस्थांकडे प्रलंबित आहे, ते त्यांच्या सक्रिय विचारात आहे," असे अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले.
आजच्या दिवसात अदानी एंटरप्राईज, नेस्ले इंडिया, एसबीआय लाईफ, HDFC Life, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स वधारले.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जेएसडब्लू स्टील, आयटीसी, इन्फोसिस, इंडसइंड या कंपन्याचे शेअर घसरले.
हेही वाचा