Rahul Gandhi : राहुल गांधींना नाहक त्रास देण्यासाठीच पोलिसांची कारवाई; काँग्रेसचा आरोप | पुढारी

Rahul Gandhi : राहुल गांधींना नाहक त्रास देण्यासाठीच पोलिसांची कारवाई; काँग्रेसचा आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क : श्रीनगरमधील वक्तव्याप्रकरणी तीन दिवसापूर्वी पाठविलेल्या नोटीसला उत्तर न दिल्याने दिल्ली पोलिस थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या घरी पोहोचले. याचा काँग्रेस कडून पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात आला. याप्रकरणी काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी, अशोक गहलोत आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, अवघ्या तीन दिवसांच्या नोटिसीनंतर पोलिस राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या घरी पोहोचली. ते ही 45 दिवसानंतर. यामागे राहुल गांधींनी आपल्या प्रश्नांनी सरकारला अडचणीत आणले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना नाहक त्रास देण्यासाठीच ही पोलिस कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

यावेळी अभिषेक मनुसिंघवी पुढे म्हणाले, 16 मार्चला राहुल गांधी यांना नोटिस पाठवले. ज्यामध्ये दोन पानांएवढे लांबलचक प्रश्न होते. त्यात राहुल गांधी यांच्याकडून त्या लाखो लोकांची माहिती विचारली जे त्यांना भारत जोडो यात्रे दरम्यान भेटले होते. गेल्या 70 वर्षात कोणत्याही अभियानाबाबत अशा पद्धतीने विचारले गेले नाही. आश्चर्यकारक हे आहे 45 दिवस पोलिस गप्प होते आणि अचानक पोलिसांना कशी काय जाग आली. हे प्रतिशोध घेण्यासाठी केले आहे.

कोणालाही सोडणार नाही – अशोक गहलोत

या परिषदेत अशोक गहलोत यांनी दिल्ली पोलिस उच्च पदस्थांच्या इशा-याशिवाय असे करू शकत नाही. आजचा घटनाक्रमावर विश्वास वाटत नाही. हिटलर देखील आधी खूप प्रसिद्ध होता. नंतर तिथे काय स्थिती झाली हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने बोलत राहतील आम्ही कोणालाही सोडणार नाही, अशा शब्दांत गहलोत यांनी या घटनेचा निषेध केला.

अडाणींच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींना (Rahul Gandhi) केले लक्ष्य

पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी म्हटले की, हे सर्व जाणूनबुझून केले जात आहे. अडाणी बाबत आम्ही जेपीसीची मागणी केल्याने यांच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात आहे. प्रथम, त्यांच्या लंडन विधानाचा विपर्यास केला जात आहे. जोपर्यंत हे सूडबुद्धीचे कृत्य सुरू राहील तोपर्यंत मध्यममार्ग निघणे शक्य नाही, असे ते म्हणाले.

हे ही वाचा :

कोल्हापूर : बाळूमामाच्या महाप्रसादासाठी १८ टन धान्य; दोन लाख भाविकांनी घेतला लाभ

Rahul Gandhi : लंडनमधील ‘त्या’ वक्तव्यावर राहुल गांधींनी केला खुलासा

नोटीसला उत्तर न दिल्याने राहुल गांधींच्या घरी दिल्ली पोलिसांची धडक; काय आहे प्रकरण?

Back to top button