लडाखच्या सीमेवरील स्थिती धोकादायक : परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांची माहिती | पुढारी

लडाखच्या सीमेवरील स्थिती धोकादायक : परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- देशाचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी सीमेवर असलेल्या तणावपूर्वक स्थितीसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. लडाखच्या पश्चिम हिमालयीन भागात भारत आणि चीन दरम्यान स्थिती नाजूक तसेच धोकादायक आहे, अशी माहिती जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना दिली. लडाखच्या काही भागामध्ये दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांच्या अत्यंत जवळ असल्याचे देखील ते म्हणाले.

२०२० मध्ये दोन्ही देशाच्या लष्करामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर, चीनचे ४० हून अधिक जवान मारले गेले होते.पंरतु, मुत्सुद्दी आणि लष्करी वार्तांच्या माध्यमातून स्थितीला शांत करण्यात आले होते.
डिसेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये चिन्हित नसलेल्या पूर्व क्षेत्रातील भागात हिंसक झटापटी झाल्या होत्या. सुदैवाने यात कुणाचा मृत्यू झाला नव्हता, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

… तोपर्यंत भारत-चीन संबंध सामान्य होवू शकत नाहीत

सप्टेंबर २०२० मध्ये चीनसोबत झालेल्या सैद्धांतिक करारानूसार सीमावादाचे निराकरण होत नाही तोपर्यंत भारत-चीन संबंध सामान्य होवू शकत नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी यानिमित्ताने चीनला दिला. सीमेवरील स्थिती अत्यंत नाजूक आहे.भारतीय लष्कर सीमेजवळ तैनात करण्यात आले असून लष्करी आकलन देखील अत्यंत धोकादायक असल्याचे जयशंकर म्हणाले.

अनेक भागातून दोन्ही देशांनी लष्कर हटवले आहे.समाधान न झालेल्या मुद्दयांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे.भारत शांती भंग करू इच्छित नाही आणि तुम्ही कराराचे उल्लंघन करू शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात चीनला सांगण्यात आले असल्याचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

या महिन्यात भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत चीनचे नवनियुक्त मंत्री किन गैंग यांच्यासोबत सीमेवरील स्थितीसंबंधी चर्चा केली. जी-२० मध्ये जागतिक चिंतेवर संपूर्णत: लक्ष देण्याची आवयश्यकता आहे. गेल्या तीन आठवड्यामध्ये भारतातील जी-२० च्या दोन मंत्रीस्तरीय बैठका युक्रेन—रशिया युद्धाने प्रभावित राहील्याचे जयशंकर म्हणाले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button