आगामी निवडणुकीत काँग्रेसशिवाय नवी आघाडी; ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची हातमिळवणी | पुढारी

आगामी निवडणुकीत काँग्रेसशिवाय नवी आघाडी; ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची हातमिळवणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेस, सपा यांसारख्या अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजप आणि काँग्रेसला दूर ठेवून आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी हातमिळवणी करत तिसरी नवी आघाडी करण्याची घोषणा शुक्रवारी (दि.१७) केली आहे.

कोलकाता येथे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यादरम्यान अखिलेश यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसपासून दूर राहण्याची घोषणा केली. सपा आणि तृणमूल काँग्रेसने हातमिळवणी केल्यानंतर बीजेडी-जेडीयूनेही या आघाडीत रस दाखवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बॅनर्जी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसने स्वतःला विरोधी पक्षांचा बॉस समजू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button