पुढारी ऑनलाईन डेस्क : हल्दवानी येथील तुरुंगात तब्बल ४४ कैदी एचआयव्ही (Human Immunodeficiency Virus) संक्रमित आढळले आहेत. या ४४ एचआयव्ही कैद्यांमध्ये एक महिला कैदी देखील एचआयव्ही संक्रमित आढळली आहे. असे एआरटी सेंटरचे डॉ. परमजीत सिंग यांनी सांगितले. डॉ सिंह यांच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात एचआयव्ही संक्रमित कैद्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या मुळे तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे. (Prisoners HIV Positive)
कैद्यांवर होणाऱ्या उपचारांची माहिती देताना डॉ. सिंह म्हणाले, "एचआयव्ही रुग्णांसाठी एआरटी (अँटीरेट्रोव्हायरल थेरपी) केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ते पुढे म्हणाले माझी टीम तुरुंगातील कैद्यांची सतत तपासणी करत आहे. कोणत्याही कैद्याला एचआयव्हीची लागण झाली आहे, त्याला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोफत उपचार आणि औषधे दिली जातात.
डॉ सिंह पुढे म्हणाले की, सध्या १६२९ पुरुष आणि ७० महिला कैदी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही संक्रमित आढळून आल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून कैद्यांची नियमित तपासणीही केली जात आहे, जेणेकरून एचआयव्हीबाधित कैद्यांवर वेळीच उपचार करता येतील.
हेही वाचा