Man Throws Currency Notes : धावत्या कारमधून फेकल्या लाखोंच्या नोटा; हरियाणात चित्रपटाला लाजवेल असा थरार!

Man Throws Currency Notes : धावत्या कारमधून फेकल्या लाखोंच्या नोटा; हरियाणात चित्रपटाला लाजवेल असा थरार!

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : तुम्ही अनेक चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये संकट काळात चलनी नोटा रस्त्यावर टाकून नायक अथवा खलनायक पोलिसांकडून आपली सुटका करुन घेतो, अशी दृष्ये तुम्ही पाहिली असतील. पण, हरियाणातील गुरुग्राममध्ये अशीच घटना घडली आहे. काही तरुणांनी धावत्या कारमधून चलनी नोटा फेकल्या आहेत. या नोटा फेकतानाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना गुरुग्राम येथील गोल्फ कोर्स रोडवर घडली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. (Man Throws Currency Notes)

रस्त्यावर फेकल्या चलनी नोटा (Man Throws Currency Notes)

गुरुग्राम मधील गोल्फ कोर्स रोडवर कारमधून दोन तरुणांनी चलनी नोटा रस्त्यावर फेकल्या. एक तरुण कारच्या मागील दरवाजा उघडून नोटा रस्त्यावर फेकत होता. याचा व्हिडिओ देखिल करण्यात आला असून तो समाज माध्यमांवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संशयितांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावरील वायरल व्हिडिओद्वारे पोलिसांनी या बाबतची माहिती मिळाली. ज्यामध्ये दोन व्यक्तीनी गोल्फ कोर्स रोडवर कारमधून चलनी नोटा फेकून चित्रपटातील दृश्य पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला असून. या घटनेची दखल घेत हा प्रकार करणाऱ्यांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह यातील मुख्य आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती डीएलएफ गुरुग्रामचे अतिरीक्त पोलिस प्रमुख विकास कौशिक यांनी दिली. (Man Throws Currency Notes)

चित्रपटातील थराराची निर्मिती

सध्या अनेक चित्रपट व वेब सिरीजमध्ये अशा चलनी नोटा रस्त्यांवर फेकण्याची दृष्ये पाहण्यास मिळत आहेत. मनी हाईस्ट या जगभर गाजलेल्या वेब सिरीजमध्ये स्पेनची बँक लुटणारे चोर पुन्हा शहरात परततात. तेव्हा ते आपण आल्याची जाणीव लोकांना करुन देण्यासाठी पुर्वी चोरलेल्या नोटा एका मोठ्या बलूनमध्ये घालून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पैशांचा पाऊस पाडतात. असा एक सीन या सिरीजमध्ये आहे आणि तो खूप गाजला देखील आहे.

यासह नुकतीच अभिनेता शाहिद कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती यांची फर्जी ही वेब सिरीज आली आहे. या सिरीजमधील शेवटच्या भागात शाहिद कपूर आणि त्याचा मित्र खोट्या नोटा कारमधून घेऊन स्वत:चा पाठलाग करणाऱ्या पोलिसांपासून धावत असतो. यावेळी पोलिसांचा पाठलाग सोडविण्यासाठी भररस्त्यात तो खोट्या नोटांचा वर्षाव करतो. अशाने रस्त्यावर नोटा घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडते आणि ट्रॅफिक निर्माण होते. अशा प्रकारे शाहिद कपूर पोलिसांकडून स्वत:ची सुटका करुन घेतो. हा सीन सुद्धा सध्या सर्वत्र गाजत आहे.

कदाचित गुरुग्रामच्या रस्त्यावर नोटा फेकणाऱ्या तरुणांनी अशा वेब सिरीज अथवा चित्रपटांमधील अशी दृष्ये पाहून तसाच माहोल पुन्हा निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई करत असून अद्याप नोट फेकणारे तरुण पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news