टीव्हीएसचा टाटा पॉवरसोबत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी करार | पुढारी

टीव्हीएसचा टाटा पॉवरसोबत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी करार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दुचाकी आणि तीन चाकी वाहन निर्मिती करणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनीने टाटा पॉवर सोबत करार केला आहे. या दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक व्हेइकल वापरण्यास चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणार आहेत. टीव्हीएस मोटरच्या ठिकाणी सौर ऊर्जा तंत्रज्ञान बसवण्यासाठी सहमती दर्शविली आहे.

या कराराचा उद्देश भारतात इलेक्ट्रिक वाहन वापराचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठे इलेक्ट्रिक दोनचाकी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर बनवणे आहे. हे टीव्हीएस आईक्यूब इलेक्ट्रिक स्कुटरच्या ग्राहकांना पूर्ण भारतात टीव्हीएस मोटर कस्टमर कनेक्ट ॲप आणि टाटा पॉवर ईजेड चार्ज ॲपद्वारे पूर्ण भारतभर टाटा पॉवरद्वारे चार्जिंग नेटवर्क पर्यंत प्रवेश करेल.

दोनचाकी इलेक्ट्रिक वाहणांसाठी नियमीत एसी चार्जिंग नेटवर्क आणि एक डीसी फास्ट चार्जिंग नेटवर्क बनवायचे आहे. या भागीदारीमुळे देशातील दुचाकी ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन मिळेल.वाढत्या जागतिक हवामान बदलामुळे वाढत्या चिंतेला, सोलर पॉवर महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावेल. दोन्ही कंपन्या सौर उर्जेचा वापर करून टीव्हीएस मोटरच्या स्टेशनला वीज देतील.

टीव्हीएसने एका निवेदनात म्हटल आहे की, टीव्हीएस मोटर ग्राहकांना ग्रीन व्हेईकल देण्यास अग्रेसर राहिली आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, “टाटा पॉवरसोबतची ही भागीदारी देशाच्या ग्रीन भविष्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमची भागीदारी जागतिक दर्जाच्या फास्ट-चार्जिंग सोल्युशन्सद्वारे आहे. ग्राहकांची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवेल. देशात सर्वसमावेशक आणि शाश्वत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात अग्रेसर असलेल्या टाटा पॉवरसोबत अग्रणी भागीदार म्हणून टीव्हीएस मोटर अत्यंत उत्साही आणि अभिमानास्पद आहे.

टाटा पॉवर सोबत कंपनीचे एमओयु पुढील काही महिन्यांमध्‍ये २५ पेक्षा अधिक शहरात टीव्‍हीएस आईक्यूब इलेक्ट्रिक चा विस्तार होणार आहे. टीव्हीएस आईक्यूब इलेक्ट्रिक स्कुटर सध्या दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, पुणे, कोच्चि, कोयंबटूर, हैदराबाद, सूरत, वाइजैग, जयपूर आणि अहमदाबाद मध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचलं का?

Back to top button