पुढारी ऑनलाईन डेस्क: देशातील ग्रामीण भागात आज ५६ टक्के लोकांच्या घरात किंवा घर परिसरात शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे. तर ग्रामीण भागातील १८ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ६७.८ टक्के व्यक्तींकडे मोबाईल फोन आहे, असे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालात
( NSS Report ) स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालात देशातील शुद्ध पाणी व्यवस्था ते शिक्षण आणि मोबाईल फोन सुविधा ते स्वच्छतागृहांपर्यंतची स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. देशातील अनेक घटकांसंदर्भातील आश्चर्यकारक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अहवालातून देशातील ग्रामीण भागातील ९५ टक्क्यांहून अधिक लोकांना शुद्ध पेयजल मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जाणून घेवूया या अहवालातील माहिती…
शहरातील स्थलांतरांचे कारणे अहवालात देण्यात आली आहेत. पुरुषांच्या स्थलांतराचे मुख्य कारण हे रोजगार आहे. यामुळे ग्रामीण भागातील ३९ टक्के आणि शहरी भागातील ५६ टक्के पुरुषांनी नोकरीसाठी घर सोडले असल्याचे म्हटले आहे. स्त्रियांना देखील घर सोडावे लागते, यामध्ये 'विवाह' हे स्त्रियांच्या स्थलांतराचे मुख्य कारण आहे. ग्रामीण भागातील ९३ टक्के आणि शहरी भागातील ७१ टक्के महिलांना लग्नानंतर घर सोडावे लागले असल्याची माहिती या अहवालात दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शाश्वत विकासाची प्राथमिक उद्दिष्ट्ये (SDGs) साध्य करण्यासाठी काही महत्त्वाचे राष्ट्रीय निर्देशक तयार करण्यासाठी डेटा गोळा केला जात आहे. पहिले सर्वेक्षण जानेवारी-डिसेंबर 2020 दरम्यान करण्याचे नियोजन होते; परंतु कोरोनामुळे ते थांबविण्यात आले. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा डेटा संकलनाचे काम झाले. सर्वेक्षणासाठी १४२६६ युनिट्स तयार करण्यात आले. त्यापैकी ग्रामीण भागासाठी ८४६९ युनिट्स आणि शहरी भागासाठी ५७९७ युनिट्स तयार करण्यात आले होते. या सर्वेक्षणात २ लाख ७६ हजार ४०९ कुटुंबांचा सहभाग होता. यामध्ये ग्रामीण भागातील १,६४,५२९ आणि शहरी भागातील १,११,८८० कुटुंबांचा समावेश होता.
हेही वाचा :