Lottery : बंपर लॉटरीने बदलले तरुणाचे भाग्य; जगातील टॉप श्रीमंतांच्या यादीत होतेय गणना... | पुढारी

Lottery : बंपर लॉटरीने बदलले तरुणाचे भाग्य; जगातील टॉप श्रीमंतांच्या यादीत होतेय गणना...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बरेचजण लॉटरीच्या माध्यमातून श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असतात. तर काहीजण लॉटरी मिळेपर्यंत लॉटरी तिकीट विकत घेत असतात. आणि एकदाचं त्यांचं स्वप्न पूर्ण होतही. आणि ही लॉटरी एवढी मोठी असते की एखाद्याचं आयुष्यचं पूर्ण बदलून जातं. अशीच एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याचं पूर्णचं आयुष्य बदलून गेलं. या लॉटरीनं त्याच्या नावावर एक विक्रमही होऊन गेला आहे. ही व्यक्ती आहे अमेरिकेमधील. त्याचं नाव आहे एडविन कॅस्ट्रो. त्याची ही लॉटरी अमेरिकेतील सर्वात मोठी लॉटरी ठरली आहे. वाचा सविस्तर बातमी. (Lottery)

टाटांपेक्षाही श्रीमंत

अमेरिकेतील सर्वात मोठी लॉटरी ठरलेली आहे ती एडविन कॅस्ट्रोची. त्याने काढलेल्या लॉटरीने त्याला टाटांपेक्षाही श्रीमंंत केलं आहे. त्याची गणना आता जगातील काही श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाऊ लागली आहे. एडविन कॅस्ट्रो हा ३० वर्षीय आहे. त्याने नोव्हेंबरमध्ये 2 अब्ज डॉलर्सची म्हणजे 16,407 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. त्याची ही लॉटरी अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी लॉटरी ठरली आहे. जगातील काही श्रीमंतामध्ये गणना केली जाणाऱ्या एडविन कॅस्ट्रोचे महागडे छंद आणि राहणीमान चर्चेचं कारण बनलं आहे.

२०० कोटींहून अधिक किंमतीचा महाल

लॉटरीनंतर त्याने कॅलिफोर्नियाच्या सबअर्बन हॉलिवूड हिल्समध्ये स्वतःसाठी  एक महागडा महाल विकत घेतला आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याची किंमत अंदाजे 200 कोटींहून अधिक असल्याची चर्चा होत आहे. त्याच्या या महालाशेजारीच अनेक हॉलिवूड कलाकारांची घरं आहेत. एका अहवालानुसार त्याचा हा महाल तीन मजली आहे. या महालात 5 बेडरूम्स, 6 टॉयलेट-बाथरूम्स आणि महालाच्या शेजारीच वाइन सेलर, स्विमिंग पूल  जिम, चित्रपटगृह, अशा सोयी आहेत.

हेही वाचा

Back to top button