K. Kavita : ‘वॉशिंग पावडर…’ पोस्टरने अमित शहांचे स्वागत, के. कविता यांच्या ईडी चौकशीवरून संताप व्यक्त

K. Kavita : ‘वॉशिंग पावडर…’ पोस्टरने अमित शहांचे स्वागत, के. कविता यांच्या ईडी चौकशीवरून संताप व्यक्त
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते के. चंद्रशेखर राव यांची कन्‍या के. कविता यांना दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी 'ईडी'ने समन्स बजावले होते. याप्रकरणी काल (दि.11) के. कविता दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. दरम्‍यान, या चौकशीचे पडसाद हैदराबादमध्‍ये उमटले. संतप्त कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी, निदर्शने करत, केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या कारवाईनंतर हेैद्राबादमध्ये 'पोस्टर वॉर' सुरु झालं आहे. 'रेड डिटर्जंट'या पोस्टरनंतर आणखी "वॉशिंग पावडर…" लिहलेलं पोस्टर हैद्रराबादमध्ये दिसून येत आहे. वाचा सविस्तर बातमी. (K. Kavita)

के. कविता या 'ईडी'च्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर हैद्राबादमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वेगवेगळ्या राज्यातील अनेक नेत्यांची खिल्‍ली उडविणारे पोस्टर्स शहरात लावण्यात आले आहेत. के. कविता यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्समध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्‍या आणि के. कविता यांच्यावर 'रेड डिटर्जंट'चा काय प्रभाव झाला हे दाखवण्यात आले आहे. भाजप नेत्यांच्या टी-शर्टचा रंग भगवा झाल्‍याचे तर के. कविता याच्या कपड्यांचा रंग अबाधित राहिल्याचे या पोस्‍टरवर नमूद करण्‍यात आले आहे.

 K. Kavita : वॉशिंग पावडर… 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्री उशिरा हैदराबाद येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) ५४ व्या वार्षिक स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले. दरम्यान तेथे आणखी एक पोस्टर्स समोर आले आहे. हे पोस्टर सोशल  मीडियावरही व्हायरल झाले आहे. यामध्ये दिसत आहे की, "वॉशिंग पावडर…", वेलकम टू अमित शहा असं लिहण्यात आले आहे तर भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्‍यांचेही फोटो दिसत आहेत.

ईडीने के.कविता यांना ९ मार्चला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण दिल्ली येथे नियोजित महिला आरक्षणासाठीच्या उपोषण आंदोलनाचा हवाला देत त्‍यांनी ११ मार्चला चौकशीला हजर राहत असल्याचे कळवले होते. दरम्यान, के.कविता यांना समन्स बजावल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) कार्यकर्ते आणि समर्थकांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news