Infosys चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, Tech Mahindra मध्ये रुजू होणार | पुढारी

Infosys चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, Tech Mahindra मध्ये रुजू होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फायनान्शियल सर्व्हिसेस आणि हेल्थकेअर/लाइफ सायन्सेस बिझनेसचे हेड असलेले इन्फोसिसचे (Infosys) अध्यक्ष मोहित जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इन्फोसिसमध्ये २२ वर्ष काम केले. मोहित जोशी यांनी राजीनामा दिला असून ते ९ जून २०२३ रोजी कंपनीतून सेवामुक्त होतील, असे Infosys ने जारी निवेदनात म्हटले आहे. अलिकडच्या दिवसात इन्फोसिसच्या उच्च पदावरून पायउतार होणारे हे दुसरे व्यक्ती आहेत. इन्फोसिसच्या वरिष्ठ पदावरील रवी कुमार एस यांनी नुकताच राजीनामा दिला होता. ते आयटी कंपनी कॉग्निजेंटचे सीईओ बनले आहेत.

मोहित जोशी आता टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

जोशी २००० मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते आणि त्यांनी कंपनीतील विविध स्तरांवर काम केले. २००७ मध्ये जोशी यांची इन्फोसिस मेक्सिकोचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इन्फोसिसच्या संचालक मंडळाने मोहित जोशी यांनी दिलेल्या सेवांबद्दल आणि कंपनीसाठी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. जोशी यांना अमेरिका, भारत, मेक्सिको आणि युरोपमध्ये काम करण्याचा व्यावसायिक अनुभव आहे.

जोशी यांची जानेवारीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोसने यंग ग्लोबल लीडर (YGL) म्हणून निवड केली होती.

हे ही वाचा :

Back to top button