Job Openings : आनंदाची बातमी! आयटी सेक्टर सावरतोय…या कंपन्यांमध्ये बंपर भरती | पुढारी

Job Openings : आनंदाची बातमी! आयटी सेक्टर सावरतोय...या कंपन्यांमध्ये बंपर भरती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Job Openings : कोरोनानंतर आलेली पश्चिमी देशांमध्ये आलेली मंदीची लाट, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम स्वरुपी मोठमोठ्या आयटी आणि कंपन्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आयटी सेक्टरमध्ये सातत्याने कर्मचारी कपात केली जात होती. मात्र, आता आयटी क्षेत्र या मंदीतून हळूहळू सावरत आहे. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रही उभारी घेत आहे. त्यामुळे आता बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉर्पोरेटसह आयटी मधील काही कंपन्यांमध्ये भरती सुरू झाली आहे.

नोकरी डॉट कॉमने दिलेल्या मासिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की मेट्रो शहरात पुन्हा एकदा रोजगार निर्मिती होत आहे. मोठ्या टेक आणि कंन्सलटन्सी फर्म आणि कंपन्यामध्ये पुन्हा नव्याने भर्ती सुरू झाली आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एअर इंडिया, या प्रमुख कॉर्पोरेट कंपन्या आहे ज्यांनी बंपर भर्ती सुरू केली आहे.

Job Openings : Infosys मध्ये 4263 नोक-या

लिंक्डइन या प्रोफेशनल वेबसाइटने म्हटले आहे की इन्फोसिसमध्ये 4263 नोक-या आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर आणि क्यूए श्रेणी, सल्लामसलत, परियोजना आणि कार्यक्रम व्यवस्थापन या पदांसाठी जागा आहेत. तर बाकी जागा इंजीनियरिंग-हार्डवेअर आणि नेटवर्किंग आणि आयटी आणि माहिती सुरक्षा क्षेत्रात आहे.

Job Openings : Air India करणार 4900 नोकरी भरती

एअर इंडियामध्ये या वर्षी 900 पेक्षा जास्त पायलट, 4000 पेक्षा अधिक केबिन क्रू सदस्यांना नियुक्त केल्या जाण्याची आशा आहे. टाटांनी एअर इंडिया खरेदी केल्यानंतर लवकरच त्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी एअर इंडिया जास्तीत जास्त अभियंते आणि पायलट यांची नियुक्ती करू शकते.

Job Openings : TCS मध्ये लेटरल हायरिंग देखील सुरू आहे

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की कंपनी आपली लेटरल हायरिंग नियुक्ती थांबवत नाही आहे. चौथ्या तिमाहीत हेडकाउंटच्या दृष्टीने कंपनी काही हजार लोकांना कामावर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Onion Price : मुस्कटदाबीसाठी सरकार उतावीळ… उपाययोजनेला विलंबाची खीळ

TMC : ममता बॅनर्जींचा लोकसभेसाठी ‘एकला चलो रे’चा नारा

Back to top button