Gross Domestic Climate Risk Report : महाराष्ट्रासह भारतातील १० राज्यांत वातावरण बदल

Gross Domestic Climate Risk Report : महाराष्ट्रासह भारतातील १० राज्यांत वातावरण बदल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 1950 पासून 2050 पर्यंत वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असणार्‍या जगातील 200 राज्यांमध्ये भारतातील 10 राज्यांचा समावेश आहेत. बिहार सर्वाधिक जोखमीचे राज्य असून जगभरातील या 200 राज्यांत महाराष्ट्र 38 व्या स्थानी आहे. महाराष्ट्राला 81% जोखीम आहे, असा निष्कर्ष ग्रॉस डिपेन्डसी इनिशिएटिव्ह या पर्यावरणीय जोखिमीचे अध्ययन करणार्‍या चमूने काढलेला आहे. (Gross Domestic Climate Risk Report)

पूर, वणवे, उष्णतेची लाट, समुद्राची पातळी वाढ अशा अनेक घटकांचा अभ्यास यात करण्यात आला. जगातील प्रत्येक राज्य, प्रांत व प्रदेशाची परस्परांशी तुलना करून वातावरणातील जोखिमीचे विश्लेषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे ग्रॉस डिपेन्डसी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन हॅमडेन यांनी सांगितले. (Gross Domestic Climate Risk Report)

चीननंतर, टॉप 50 मध्ये भारताचाच क्रमांक आहे. भारतातील सर्वाधिक 9 राज्ये टॉप 50 मध्ये असून यात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि केरळचा त्यात समावेश आहे.
2050 पर्यंतच्या जोखीमीबाबत ज्या 200 प्रांतांचा अभ्यास करण्यात आला त्यातील निम्म्याहून अधिक 114 राज्ये आशिया खंडातील आहेत. (Gross Domestic Climate Risk Report)

2050 मध्ये सर्वाधिक जोखीम असलेल्या आशियातील 114 राज्यांमध्ये बिहारचा 22 वा क्रमांक आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेश 25, आसाम 28, राजस्थान 32, तामिळनाडू 36, महाराष्ट्र 38, गुजरात 44, केरळ 50, पंजाब 48 आणि मध्य प्रदेशचा 52 वा क्रमांक आहे.

चीन, अमेरिका, भारतात जोखीम

  • सर्वाधिक जोखीम असलेल्या जगातील पहिल्या 200 राज्यांत 114 राज्ये आशियातील आहेत.
  • जोखीम असलेल्या टॉप-50 राज्यांपैकी 80 टक्के राज्ये ही चीन, अमेरिका व भारतातील आहेत.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news