Women’s day 2023 : रॅपिंगच्या जगात पोरीच हुश्शार ! या ‘female rappers’ चा आहे बोलबाला | पुढारी

Women's day 2023 : रॅपिंगच्या जगात पोरीच हुश्शार ! या 'female rappers' चा आहे बोलबाला

पुढारी डिजीटल : रॅप किंवा रॅपर्सबाबत ऐकलं की अनेक देशी – परदेशी नावं डोळ्यासमोर येतात. पण विशेषत: भारतीय रॅप संगीताच्या क्षेत्रात बरीच नावं ही Male rappers ची दिसायची. पण आता चित्र बदलू लागलं आहे. आता मुलीही स्टेजवर रॅप करताना मुलांना जोरदार टशन देताना दिसतात. भारतात आता मुलीही जोरदार रॅपिंग करताना दिसतात. आज महिला दिनानिमित्त आम्ही अशाच काही खास कलाकारांची ओळख करून देणार आहोत ज्या ठसकेबाज रॅप सादर करण्यासाठीच ओळखल्या जातात.

दीपा उन्नीकृष्णन :
Dee MC या नावाने ओळखली जाणारी दीपा speak my way या हिप हॉप आणि रॅप गाण्याने प्रकाशझोतात आली. 2012 ला दीपाने तिच्या रॅप करियरची सुरुवात केली. लैंगिक असमानता आणि समान अधिकार या संबंधी तिच्या रॅप सॉन्ग मधून व्यक्त होताना दिसते. याशिवाय रॅपर म्हणून तिची सुरुवात , त्या वाटेत तिला आलेल्या अडचणी त्यांच्यावर केलेली मात यातून दीपा व्यक्त होताना दिसते. तिच्या talk my way या गाण्याला रेडियो सिटी अवॉर्डससाठी नामांकनही मिळालं होतं. दीपा उत्तम लेखिकाही आहे. बस तू नाच, शूरु करे क्या, taking my time, talk my way, bulletproof, rise up ही पुस्तकं ही लिहली आहेत.

अग्रिमा धवन :
ॲग्सी या नावाने अग्रिमा रॅप करते. ती दहा वर्षांची असल्यापासून संगीत क्षेत्राशी जोडली गेली आहे. Nicki Minaj हे तिचे या क्षेत्रातील आदर्श आहेत. लैंगिक असमानता, चाइल्ड अब्युज या विषयांवरील रॅप लोकप्रिय आहेत. हसल या शोमधून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अग्रिमा हिंदी, पंजाबी आणि इंग्रजीमधून रॅप करते.

मेबा ऑफिलिया :
शिलॉन्गमध्ये राहिलेल्या मेबासाठी रॅप आणि हिप हॉप तिचं जणू सर्वस्व आहे. 2016 मध्ये एका शिलॉन्गमधील एका कार्यक्रमात तिची ही कला सगळ्यांच्या समोर आली. Done talking हा तिचा डेब्यू ट्रॅक सोशल मिडियावर व्हायरल झाला . या गाण्याने तिला चांगलीच प्रसिद्धी दिली. या गाण्यातील तिची शैली लक्षवेधी ठरली. या गाण्यासाठी तिला 2018 चा Mtv युरोपियन म्युझिक अवॉर्डही मिळाला.

आर्या जाधव :
या यादीतील बहुप्रतीक्षित आणि प्रसिद्ध असलेलं मराठमोळ नाव म्हणजे आर्या जाधव. आर्याने नऊवारीमध्ये हसल 2.0 च्या मंचावर घातलेला रॅपचा धुडगूस चाहते अजूनही विसरले नाहीत. QK या नावाने आर्या रॅप करते. करोना काळात आर्याने आवड म्हणून रॅप गायला सुरुवात केली. पण रिअलिटी शोच्या मंचावर त्याला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली.

Back to top button