Earthquake in Kachchh: गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के | पुढारी

Earthquake in Kachchh: गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन: Earthquake in Kachchh: गुजरातमधील कच्छ येथे आज पहाटे ३.४२ च्या सुमारास (दि.८) भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तिव्रता ३.३ रिश्टर इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील भचौ शहरापासून सुमारे 10 किमी उत्तर-ईशान्य (NNE) दिशेला होता. यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी येथे 3.8 रिश्टर स्केलचा शेवटचा भूकंप नोंदवण्यात आला होता, अशी माहिती भूकंपविज्ञान संशोधन संस्थेने दिली आहे. या भूकंपात कोणत्याही प्रकारे मालमत्‍ता किंवा जीवित हानी झाली नसल्याचे येथील अधिका-यांनी सांगितले आहे.

Earthquake in Kachchh: कच्छ अत्यंत संवेदनशील क्षेत्र

अहमदाबादपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेले कच्छ हे शहर अत्यंत संवेदनशील क्षेत्रात स्थित आहे. याठिकाणी कमी तीव्रतेचे भूकंप नियमितपणे अनुभवता येतात. सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या या जिल्ह्याला जानेवारी 2001 मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाचा फटका बसला होता. या भूकंपात 13,800 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1.67 लाख लोक जखमी झाले होते. तसेच या भूकंपामुळे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांमधील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचा:

Back to top button