Earthquake : अफगाणिस्तानसह ताजिकिस्तानही भूकंपाने हादरले | पुढारी

Earthquake : अफगाणिस्तानसह ताजिकिस्तानही भूकंपाने हादरले

काबुल : पुढारी ऑनालाईन अफगाणिस्‍तानला आज (मंगळवार) भूकंपाचे धक्‍के बसले. राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्र (NCS) च्या माहितीनुसार ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूगर्भात १० किमीवर या भूकंपाचे केंद्र होते. यामध्ये जीवित व वित्‍तहानीचे वृत्‍त अद्याप समोर आलेले नाही. दरम्‍यान ताजिकिस्तान मध्येही आज भूकंप झाला. ४.३ रिश्टर स्‍केल तीव्रतेचा हा भूकंप होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने याची माहिती दिली.

तुर्कीमध्ये ६ फेब्रुवारी रोजी शक्‍तीशाली भूकंप झाला होता. यामध्ये ५० हजार लोक ठार झाले होते. यामध्ये अनेक शहरे उद्ध्वस्‍त झाली होती. गेल्‍या काही दिवसांपासून आशिया खंडात भूकंपाचे प्रमाण वाढले असून, रोज कोठे ना कोठे भूकंपाचे धक्‍के जाणवू लागले आहेत.

 

 

Back to top button