

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण फिलीपिन्स भाग भूकंपाने हादरले आहे. आज मंगळवारी झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ६.० इतकी होती, अशी माहिती अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांनी संभाव्य नुकसानीचा इशारा दिला आहे. तर हा भूकंप भूगर्भात ८ किमी (४.९७ मैल) खोलीवर होता, असे युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे. (Philippines earthquake)
मिंडानाओ येथे या भूकंपाचे हादर बसले आहेत. मिंडानाओ हे फिलीपिन्समधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. मिंडानाओ येथे या भूकंपाचे हादर बसले आहेत. मिंडानाओ हे फिलीपिन्समधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. मिंडानाओ बेटावरील दावो दी ओरो या पर्वतीय प्रांतातील मारागुसान पालिकेपासून काही किलोमीटर अंतरावर दुपारी २ वाजता भूकंप झाला.
दरम्यान, तूर्कीत अलीकडेच झालेल्या भूकंपात ४५ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. शक्तिशाली भूकंपाने येथील हजारो इमारती कोसळल्या आहे.
हे ही वाचा :