Jammu and Kashmir : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन, १ ठार, ६ जखमी | पुढारी

Jammu and Kashmir : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन, १ ठार, ६ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  रामबन जिल्ह्यातील सेरी भागाजवळ जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.७ ) भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. सुरजित सिंग असे मृताचे नाव आहे. तो सुंबर येथिल रहिवासी आहे. या अपघाता वेळी तीन वाहनांतून प्रवास करणाऱ्या दोन मुलांसह सात जण अडकले होते. वाचा सविस्तर बातमी. (Jammu and Kashmir )

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने अनेक वाहने अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अडकलेल्यांचे प्राण वाचले. रामबन डीसी मसरत झिया यांनी सांगितले की, घटनेनंतर लगेचच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे आम्ही लोकांना वाचवण्यात यशस्वी झालो. दरम्यान, ढिगारा साचल्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (रामबन) मोहिता शर्मा यांनी सांगितले की, रामबन शहराजवळील सेरी गावाजवळ २७० किमी लांबीच्या महामार्गावर भूस्खलन होऊन सात जण जखमी झाले आहेत. सुरजित सिंगचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी मोहम्मद ताज, हमीद रुबिना बेगम, सकीना बेगम, सलमा बानी आणि आमिर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भूस्खलनात किमान दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button