

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bangladesh : बांग्लादेशची राजधानी ढाका इथे आज मंगळवारी एका इमारतीत विस्फोट झाला. घटनेत कमीत कमी 7 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिकजण जखमी झाल्याची माहिती आहे. बांग्लादेशच्या स्थानिक माध्यमांनी याविषयी माहिती दिली आहे. याच्या सविस्तर वृत्ताची अद्याप प्रतीक्षा आहे.
Bangladesh : बांग्लादेशमध्ये शनिवारी चटगाव येथील एक ऑक्सीजन संयंत्रात विस्फोट होऊन आग लागण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा झालेल्या विस्फोटाने बांग्लादेश हादरला आहे. शनिवारी झालेल्या विस्फोटात किमान सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 पेक्षा जास्त जखमी झाले होते. तसेच फेब्रुवारीत देखील एका इमारतीत लागलेल्या एका भीषण आगीत एकाचा मृत्यू होऊन अनेकजण आगीत होरपळले होते.
Bangladesh : त्यानंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा भीषण विस्फोट झाला आहे. एएनआय आणि अमर उजालााने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कमीत-कमी 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बचाव कार्य सुरू असून सविस्तर वृत्त अद्याप प्रतीक्षेत आहे.
हे ही वाचा :