बिहार- तरुण दुचाकीसह जिवंत जळाला | पुढारी

बिहार- तरुण दुचाकीसह जिवंत जळाला

बेगुसराय; वृत्तसंस्था : बिहारमधील बेगुसरायमध्ये संजीत कुमार हा अंबा या गावातील तरुण दुचाकीसह जिवंत जळाला. दुचाकी एका मिनी ट्रकला धडकली. दुचाकीने पेट घेतला. त्यात या तरुणाचा दुचाकीवरच बसलेल्या स्थितीत कोळसा झाला.  बेगुसरायच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वर ही घटना रात्री घडली. नुकतेच संजीतचे लग्न झाले होते व सासरच्यांकडून त्याला ही दुचाकी मिळालेली होती. दुचाकीवरून होळीनिमित्त तो सासरी चाललेला होता?

Back to top button