MRSAM Missile : भारतीय नौदलाकडून MRSAM ची यशस्वी चाचणी (व्हिडिओ) | पुढारी

MRSAM Missile : भारतीय नौदलाकडून MRSAM ची यशस्वी चाचणी (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाने मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलची (MRSAM) यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र विशाखापट्टणम गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर (INS Visakhapatnam) वरून डागण्यात आले. यावेळी त्याने जहाजविरोधी क्षेपणास्त्रे क्षमता सिद्ध केली. MRSAM ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने इस्राईलच्या IAI कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.

MRSAM चे वजन सुमारे 275 किलो आहे. लांबी 4.5 मीटर आणि व्यास 0.45 मीटर आहे. या क्षेपणास्त्रावर 60 किलो वॉरहेड बसवता येऊ शकते. हे दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे, जे प्रक्षेपणानंतर कमी धूर सोडते. एकदा लाँच झाल्यावर, MRSAM आकाशात 16 किमी पर्यंतचे लक्ष्य पाडू शकते. त्याची रेंज अर्धा किलोमीटर ते 100 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजेच या परिघात येणारे शत्रूचे वाहन, विमान, ड्रोन किंवा क्षेपणास्त्र नष्ट करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे.

INS विशाखापट्टणम डिस्ट्रॉयरमध्ये 32 अँटी-एअर बराक क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. त्याची रेंज 100 किलोमीटर आहे. तसेच बराक 8ER क्षेपणास्त्रे देखील तैनात केली जाऊ शकतात, ज्याचा पल्ला 150 किलोमीटर आहे. यामध्ये 16 अँटी-शिप किंवा लँड अॅटॅक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बसवता येऊ शकतात. या दोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झाल्यानंतर ही युद्धनौका शत्रूची जहाज आणि विमानांसोबत दोन हात करू शकते.

या क्षेपणास्त्रातील नवीन गोष्ट म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, म्हणजे शत्रूचे वाहन चकवा देण्यासाठी केवळ रेडिओ वापरत असेल तरी आपले लक्ष्य नष्ट करू शकते. त्याचा वेग 680 मीटर प्रति सेकंद म्हणजेच 2448 किलोमीटर प्रति तास आहे. भारताने इस्राईलकडून MRSAM क्षेपणास्त्रांच्या पाच रेजिमेंट खरेदी करण्याबाबत सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. यात 40 लाँचर्स आणि 200 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

 

हेही वाचा : 

Back to top button