विमानाचा आपत्‍कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्‍न; फ्लाईट अटेंडंटवर चाकूहल्‍ला, अमेरिकन विमानात गोंधळ

विमानाचा आपत्‍कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्‍न; फ्लाईट अटेंडंटवर चाकूहल्‍ला, अमेरिकन विमानात गोंधळ

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील लॉस एंजेलिसहून बोस्टनला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये 33 वर्षीय व्यक्तीने प्रथम आपत्कालीन गेट उघडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर फ्लाइट अटेंडंटच्या मानेवर चाकूने हल्ला केल्याने गोंधळ उडाला. टॉरेस नावाच्या या व्यक्तीला बोस्टन लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ९ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोरेस हे लॉस एंजेलिसहून बोस्टनला जाणार्‍या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसले होते. लँडिंगच्या सुमारे 45 मिनिटे आधी, फ्लाइटच्या चालक दलाला कॉकपिटमध्ये अलार्म ऐकू आला. त्‍यांना लक्षात आले की कोणीतरी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर फ्लाइट अटेंडंटच्या लक्षात आले की दरवाजाचे लॉकिंग हँडल उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे हँडल जवळपास उघडण्यात आले होते. फ्लाइट अटेंडंटने ताबडतोब दरवाजे आणि इमर्जन्सी स्लाइड्स बंद केल्या आणि कॅप्टन आणि फ्लाइट क्रूला या प्रकरणाची माहिती दिली.

फ्लाइट अटेंडंटच्या मानेवर तीन वेळा हल्ला करण्यात आला

या घटनेबाबत फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, त्याने टॉरेसला दरवाजाजवळ पाहिले होते. त्यानंतर एका फ्लाइट अटेंडंटने दरवाजाच्या छेडछाडीबद्दल टॉरेसला विचारले होते. फ्लाइट अटेंडंटने कॅप्टनला सांगितले की टोरेसने विमानाला धोका निर्माण केला आहे आणि कॅप्टनला शक्य तितक्या लवकर विमान जमिनीवर उतरवणे आवश्यक आहे. थोड्या वेळात, टॉरेस स्टारबोर्डच्या बाजूच्या दरवाजाजवळ आला जिथे दोन फ्लाइट अटेंडंट उभे होते. त्यानंतर तो एका फ्लाइट अटेंडंटकडे झेपावला आणि तिच्या मानेवर तीनदा हल्ला केला.

टोरेसला तुरुंगवास भोगावा लागू शकतो

त्यानंतर प्रवाशांनी टोरेसला पकडले आणि फ्लाइट क्रूच्या मदतीने त्याला हल्ला करण्यापासून रोखले. बोस्टनमध्ये फ्लाइट उतरल्यानंतर काही वेळातच टॉरेसला ताब्यात घेण्यात आले. फ्लाइट क्रू मेंबर्स आणि अटेंडंट्सवर हल्ला केल्याबद्दल टॉरेसला जन्मठेपेची शिक्षा आणि मोठा दंड होऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news