अमेरिकेतील बोस्टन लोगान विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एफएएकडून तपास सुरू | पुढारी

अमेरिकेतील बोस्टन लोगान विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एफएएकडून तपास सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या दोन विमानांची सोमवारी (दि.६) टक्कर झाली. CNN ने फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) चा हवाला देऊन सांगितले की, बोस्टन लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणारी दोन युनायटेड एअरलाइन्सची उड्डाणे एकमेकांना धडकली.

एफएएने निवेदनात म्हटले आहे की, युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट 515 चा उजवा विंग बोस्टन लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट 267 ला आदळला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. दोन्ही विमाने बोईंग 737 होती आणि प्रस्थान करणार होती. या घटनेनंतर दोन्ही फ्लाइटमधील प्रवाशांना नियोजित इतर फ्लाइटमध्ये पुन्हा बसवण्यात आले. प्रवाशांनी ही घटना धक्कादायक असल्याचे सांगितले.

 

Back to top button