रशियन तेलाची आयात पोहोचली विक्रमी स्तरावर | पुढारी

रशियन तेलाची आयात पोहोचली विक्रमी स्तरावर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – रशियाहून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची आयात विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. सरत्या फेब्रुवारी महिन्यात प्रती दिवस १.६ दशलक्ष बॅरल इतकी क्रूड तेलाची आयात झाल्याचे इंधन वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या व्होरटेक्सा नावाच्या संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

तब्‍बल ३४ टक्‍क्‍यांनी वाढली आयात

रशियन तेलाची आयात पारंपरिक पुरवठादार देश असलेल्या इराक आणि सौदी अरेबियापेक्षाही जास्त झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात देशाला लागणाऱ्या एकूण तेलापैकी एक तृतीयांश तेल रशियाहून आयात करण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध सुरु होण्यापूर्वी भारत आयात करीत असलेल्या तेलापैकी एक टक्क्यांपेक्षाही कमी तेल रशियाहून आयात करीत होता. मात्र हेच प्रमाण आता ३५ टक्क्यांवर गेले आहे.

चीन आणि अमेरिकापाठोपाठ भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा क्रूड तेल आयातदार देश आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व युरोपियन देशांनी रशियन तेल खरेदीवर बंदी घातली आहे. दुसरीकडे रशिया भारतासह इतर मित्रदेशांना सवलतीच्या दरात तेल देत आहे आणि भारत त्याचा पुरेपूर फायदा उठवित आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button