Tulip Garden opened : श्रीनगर : रंगीबेरंगी फुलांचा स्‍वर्ग ‘ट्युलिप गार्डन’ पर्यटकांसाठी खुले | पुढारी

Tulip Garden opened : श्रीनगर : रंगीबेरंगी फुलांचा स्‍वर्ग 'ट्युलिप गार्डन' पर्यटकांसाठी खुले

जम्मू ; पुढारी ऑनलाईन एका बाजुला बर्फानी अच्छादलेली पर्वत शिखरे दुसऱ्या बाजुला दल सरोवराचा किनारा आणि मधोमध विविध रंगी ट्युलिपची मनमोहवणारी फुले हे काश्मीरचे निसर्गसौदर्य दरवर्षी पहायला मिळते. आज (रविवार) पुन्हा एकदा जम्‍मू-काश्मीरच्या फ्लोरिकल्‍चर विभागाकडून हे गार्डन पर्यटकांसाठी (Tulip Garden opened) खुले करण्यात आले.

फ्लोरिकल्चर, पार्क्स आणि गार्डन्स विभागाने आज उधमपूर जिल्ह्यातील हायलँड पार्क कुड येथील ट्यूलिप गार्डन (Tulip Garden opened) पर्यटकांसाठी खुले केले. फ्लोरिकल्चर, पार्क्स अँड गार्डन्स जम्मूचे महासंचालक जतिंदर सिंग यांनी सरपंच कुड, कुलदीप कुमार, स्थानिक पीआरआय सदस्य आणि विभागाच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन पर्यटन हंगामाची सुरुवात म्हणून उद्यान खुले झाल्‍याचे घोषित केले.

फ्लोरिकल्चर महासंचालक आपल्या भाषणात म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर हे अतुलनीय सौंदर्य आणि नैसर्गिक लँडस्केप्सने समृद्ध आहे. ज्यात पर्यटनासाठी प्रचंड क्षमता आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिकांना त्यांची संस्कृती आणि लोककलेचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

विभागाने हायलँड पार्क कुड उधमपूर येथे 5 विविध प्रकारच्या ट्यूलिप्सची (Tulip Garden opened) 12000 रोपे लावली आहेत. यावेळी महासंचालकांनी सांगितले की, यावर्षी जम्मू विभागातील पहिले मोठे ट्युलिप गार्डन सणसर जिल्हा रामबन येथे मोठ्या क्षेत्रफळावर विकसित केले जात आहे. 40 कनाल, जेथे विभागाने 25 विविध जातींचे 2.7 लाख ट्युलिपची रोपे लावली आहेत.

दरम्यान, उद्यानाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी स्थानिकांनी, तसेच हायलँड पार्क येथील कुडमध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने बागेतील ट्यूलिप्सची झलक (Tulip Garden opened) पाहण्यासाठी गर्दी केली होती.

 

हेही वाचा ;  

Back to top button