Odisha Accident news : लग्न आटोपून घरी परतताना काळाचा घाला, वाहन कालव्यात कोसळून ७ ठार, २ जखमी | पुढारी

Odisha Accident news : लग्न आटोपून घरी परतताना काळाचा घाला, वाहन कालव्यात कोसळून ७ ठार, २ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. लग्न समारंभ आटोपून घरी परतताना चाकरचाकी वाहन कालव्यात कोसळून हा अपघात झाला. यात ७ जण ठार झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत झारसुगुडा जिल्ह्यातील बडाधरा गावातील रहिवासी आहेत. ते संबलपूर शहराजवळील एका गावातून झारसुगुडा येथील त्यांच्या गावी परतत होते. त्याचे वाहन कालव्यात कोसळून बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Odisha Accident news)

संबलपूर जिल्ह्यात आज पहाटे कार कालव्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू झाल, तर दोघे जखमी झाले. हे सर्वजण विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतत होते, अशी माहिती संबलपूरचे उपजिल्हाधिकारी प्रभास दानसेना यांनी दिली आहे.

अजित खमारी (२५), सुबल भोई (२४), रमाकांत भोई, दिब्या लोहा, सरोज सेठ, सुमंत भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावे आहेत.
कालव्यातून सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, गाडीचा चालक फरार आहे. दुसरीकडे, दोन गंभीर जखमींना संबलपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (डीएचएच) दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

“बचावपथक वेळीच घटनास्थळी पोहोचले असते तर सर्व प्रवाशांना वाचवता आले असते. पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. आम्ही वाहनाच्या काचा फोडल्या आणि स्वतःला वाचवलं. आम्ही त्यांना वाचवले तेव्हा त्यांचा श्वास सुरू होता. पण कोणतीही रुग्णवाहिका किंवा ऑक्सिजन सपोर्ट घटनास्थळी पोहोचला नाही. ज्यानंतर सहा जणांचा मृत्यू झाला,” असे अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले. (Odisha Accident news)

 हे ही वाचा :

Back to top button