Uzbekistan Cough Syrup Deaths : उझबेकिस्तानातील १८ मुलांच्या मृत्यू प्रकरणी बनावट औषध निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपनीवर कारवाई | पुढारी

Uzbekistan Cough Syrup Deaths : उझबेकिस्तानातील १८ मुलांच्या मृत्यू प्रकरणी बनावट औषध निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपनीवर कारवाई

नोएडा; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील कफ सिरप कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नोएडा येथील फार्मास्युटिकल कंपने बनवलेले कफ सिरफ औषध पिऊन उझबेकिस्तान मधील १८ मुलांचा मृत्यू झाला होता. तपासणी अंती या कंपनीने बनवलेले औषध सदोष आढळले आहे. कंपनीकडून औषधांचे ३६ नमुने घेण्यात आले होते त्यापैकी २२ नमुने सदोष आढळले. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून या कंपनीवर शुक्रवारी (दि. ३) छापा टाकण्यात आला व कंपन्यांच्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कंपनीचे मालक व त्याची पत्नी फरार आहेत. कंपनीकडून स्थानिक बाजारपेठेत व विदेशात पाठवण्यात आलेले औषधे परत मागविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Uzbekistan Cough Syrup Deaths)

हे संपूर्ण प्रकरण भारतीय फार्मास्युटिकल फर्म मेरियन बायोटेकशी संबंधित आहे. डिसेंबरमध्ये, उझबेकिस्तानकडून माहिती मिळाल्यानंतर, आरोग्य मंत्रालयाने त्याची तपासणी सुरू केली. तपासाचे काम सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) यांना देण्यात आले होते. CDSCO ने या संदर्भात उझबेकिस्तानच्या नॅशनल ड्रग रेग्युलेटरकडून बरीच माहिती गोळा केली होती. यानंतर औषध कंपनीची तपासणी करून नमुने घेण्यात आले. हे नमुने चंदीगड येथील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत (आरडीटीएल) चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नमुने चाचणीत मानकांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे समोर आले होते. (Uzbekistan Cough Syrup Deaths)

त्यानंतर सीडीएससीओ नॉर्थ झोन ऑफिस गाझियाबाद येथे कार्यरत असलेले ड्रग्ज इन्स्पेक्टर आशिष कौंडल यांनी गुरुवारी रात्री उशिरा फेज-3 पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. यामध्ये मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक जया जैन, सचिन जैन, ऑपरेशन हेड तुहिन भट्टाचार्य, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट अतुल रावल आणि मूल सिंग अशी आरोपींची नावे आहेत. यानंतर पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर 67 मध्ये असलेल्या कंपनीवर कारवाई सुरू केली आणि तुहीन भट्टाचार्य, अतुल रावत आणि मूल सिंह यांना अटक केली. (Uzbekistan Cough Syrup Deaths)

अद्याप फरार असणारे कंपनीचे मालक सचिन जैन आणि जया जैन यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा पोलिसांचा दावा आहे. सीडीएससीओसोबतच यूपीच्या औषध विभागाचाही तपासात सहभाग होता.

९ जानेवारी रोजी उत्पादन थांबवले

जिल्हा औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर रोजी कंपनीकडून नमुने घेण्यात आले. या कंपनीचे कफ सिरप देशात विकले जात नाही. ती उझबेकिस्तान तसेच कंबोडिया, किर्गिस्तान आणि इतर देशांमध्ये निर्यात केली जात होती. उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने 9 जानेवारी रोजी कंपनीचा उत्पादन परवाना निलंबित केला आणि उत्पादन बंद केले. तेव्हापासून उत्पादन होत नव्हते.

डिसेंबर 2020 मध्ये, उझबेकिस्तानमध्ये मॅरियन बायोटेक कंपनीने बनवलेले सिरप प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू झाला होता. कझाकिस्तान सरकारच्या माहितीच्या आधारे भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आणि कंपनीवर छापे टाकण्यात आले.

अधिक वाचा :

Back to top button