Congress MLA : देशातील एकूण आमदारांत काँग्रेसचा वाटा फक्त १६ टक्के | पुढारी

Congress MLA : देशातील एकूण आमदारांत काँग्रेसचा वाटा फक्त १६ टक्के

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात एकूण 4033 आमदार आहेत. सन 2014 मध्ये काँग्रेसचे 658 म्हणजेच 24 टक्के आमदार होते, आता ही संख्या 16 टक्केवर आली आहे. देशातील 5 राज्यांत तर काँग्रेसचा एकही आमदार नाही. नागालँडच्या निकालानंतर येथील भोपळा फुटण्याची काँग्रेसची आशाही मावळली. (Congress MLA)

एकही जागा या राज्यात काँग्रेसला जिंकता आली नाही. काँग्रेसचा सूर्य पूर्वेलाही अस्ताकडे गेला आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या निकालांनी काँग्रेसची निराशा केली आहे. त्रिपुरात मात्र काँग्रेस भोपळा फोडण्यात यशस्वी ठरली. निकालाअंती या राज्यात 0 वरून काँग्रेसची सदस्यसंख्या 3 वर गेली आहे. मेघालयात मात्र अधोगती वाट्याला आली. काँग्रेसच्या या राज्यात 21 जागा होत्या. त्या 5 वर आल्या आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप त्रिपुरामध्ये बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन करणार आहे, तर उर्वरित दोन्ही राज्यांतून त्यासाठी युती करणार आहे. मोदींच्या कार्यकाळात देशातील एकूण भाजप आमदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. (Congress MLA)

घसरती काँग्रेस (Congress MLA)

  • 2014 पासून काँग्रेसची ही स्थिती कायम आहे. या पक्षाची घसरणच सुरू आहे.
  • देशभरातील आमदारांची एकूण संख्या 4 हजार 33 आहे. काँग्रेसचे आमदार 658
  • 8 वर्षांत काँग्रेसच्या आमदारांची संख्या 24 टक्क्यांवरून 16 टक्क्यांवर आली
  • 5 राज्यांत काँग्रेसचा एकही आमदार नाही, 9 राज्यांमध्ये 10 पेक्षा कमी आमदार
  • 1951 मध्ये तामिळनाडू वगळता सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते.
  • काँग्रेसकडे आता केवळ 3 राज्यांमध्ये मुख्यमंत्री राहिले आहेत.

Congress MLA

2014 नंतर यांनी सोडली काँग्रेस

  • जानेवारी 2015 कृष्णा तीरथ
  • जानेवारी 2015 जयंती नटराजन
  • ऑगस्ट 2015 हेमंता बिस्वा सरमा
  • ऑक्टो. 2016 रिटा बहुगुणा जोशी
  • मार्च 2017 एस. एम. कृष्णा
  • जुलै 2020 सुमित्रा कासडेकर
  • ऑक्टोबर 2020 खुशबू सुंदर
  • मार्च 2021 पी. सी. चाको
  • डिसेंबर 2021 ज्योतिरादित्य शिंदे
  • मे 2021 अमरिंदर सिंग
  • जून 2021 जतीन प्रसाद
  • जानेवारी 2022 आरपीएन सिंह
  • फेब्रुवारी 2022 अश्विनी कुमार
  • एप्रिल 2022 रिपून बोरा
  • मे 2022 सुनील जाखड
  • मे 2022 हार्दिक पटेल
  • मे 2022 कपिल सिब्बल
  • ऑगस्ट 2022 जयवीर शेरगिल
  • ऑगस्ट 2022 गुलाम नबी आझाद

Congress MLA

  • या राज्यांत काँग्रेसचे 10 पेक्षा कमी आमदार : यूपी, ओडिशा, तेलंगणा, गोवा, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, पुद्दुचेरी
  • या राज्यांत काँग्रेस 0 : नागालँड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, सिक्कीम
  • 2014 पूर्वी या राज्यांत काँग्रेसचे सरकार : महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, आसाम, मिझोराम, केरळ
  • 2023 मध्ये काँग्रेसकडे ही 6 राज्ये : राजस्थान, हिमाचल प्रदेश, बिहार (जेडीयू-आरजेडीसह युती), झारखंड (झामुमोसह युती), छत्तीसगड, तामिळनाडू (डीएमकेसोबत युती)

अधिक वाचा :

Back to top button