Rajiv Jain Invest In Adani Group : अदानींसाठी धावून आला ‘हा’ अमेरिकन भारतीय | पुढारी

Rajiv Jain Invest In Adani Group : अदानींसाठी धावून आला ‘हा’ अमेरिकन भारतीय

मुंबई; पुढारी ऑनलाईन : हिंडनबर्ग अहवालानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानींच्या (gautam adani) अडचणी थांबण्याचे नावच घेत नाहीत. मात्र, या संकटाच्या काळात अदानींना एका अमेरिकन भारतीयाने मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेतील बुटीक इन्वेस्टमेंट फर्म जीक्यूजी पार्टनर्सने अदानी समुहातील चार कंपन्यांमध्ये तब्बल १५ हजार ४४६ कोटींची गुंतवणूक केली आहे. गुरुवारी (दि.२) या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीचा व्यवहार करण्यात आला. जीक्यूजी पार्टनर्सचे मालक भारतीय वंशाचे राजीव जैन (Rajiv Jain) हे आहेत. या गुंतवणुकीच्या निमित्ताने अदानींसाठी एक भारतीय धावून आला आहे, असेच म्हणावे लागेल. (Rajiv Jain Invest In Adani Group)

राजीव जैन यांनी २०१६ चालू केली इन्वेस्टमेंट फर्म (Rajiv Jain Invest In Adani Group)

मूळचे भारतीय असणारे राजीव जैन यांनी २०१६ साली जीक्यूजी पार्टनर्सची सुरुवात केली. ही फर्म ऑस्ट्रेलियामध्ये रजिस्टर्ड आहे. या इन्वेस्टमेंट फर्मने अदानी ग्रुप Adani Group मधील अदानी पोर्टस् ॲन्ड स्पेशल इकोनॉमीक झोन (Adani Ports), अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy), अदानी एंटरप्राईजेज लिमिटेड (Adani Enterprises Ltd) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

अदानींच्या इतक्या शेअर्सची खरेदी

जीक्यूजी पार्टनर्स ने अदानी एंटरप्राईजेस मध्ये ३.४ टक्क्यांची भागीदारी मिळविण्यासाठी जवळपास ५ हजार ४६० कोटी, अदानी पोर्टस् मधील ४.१ टक्क्यांच्या भागीदारीसाठी ५ हजार २८२ कोटी, अदानी ट्रान्समिशन मधील २.५ टक्क्यांच्या भागीदारीसाठी १ हजार ८९८ कोटी आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ३.५ टक्के भागिदारी मिळविण्यासाठी २ हजार ८०६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जीक्यूजीने यासह ITC, HDFC, RIK, ICICI Bank, SBI, Sun Pharma, Infosys, Bharti Airtel, Tata Steel, HDFC AMC, JSW Steel सारख्या अन्य भारतीय कंपन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे. (Rajiv Jain Invest In Adani Group)

कोण आहेत राजीव जैन ?

भारतात जन्मलेले आणि इथेच शिक्षण पुर्ण करणारे राजीव जैन यांनी १९९० मध्ये मियामी विद्यापीठातून एमबीएची पदवी घेऊन अमेरिकेला गेले. यानंतर त्यांनी १९९४ वान्टोबेल मध्ये दाखल नंतर २००२ मध्ये ते स्विस फर्मचे CIO बनले. नुकत्याच आलेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार त्यांनी मार्च २०१६ मध्ये जीक्यूजी पार्टनर्स सुरु करण्यासाठी स्विस फर्मला रामराम केला.

राजीव जैन यांचा अदानींवर विश्वास

महत्वाची गोष्ट म्हणजे अदानींचे शेअर्स गेल्या काही दिवसात सातत्याने पडत असताना या अमेरिकेन कंपनीने अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून अदानींच्या शेअर्स काहीप्रमाणात उसळी घेतली आहे. राजीव जैन यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार, अदानी यांच्या कंपन्या संपुर्ण भारतात आणि जगात काही महत्वकांक्षी प्रकल्पांचे व्यवस्थापन करत आहेत. सध्याच्या काळात गौतम अदानींना व्यापक प्रमाणात एक सर्वश्रेष्ठ उद्योपती म्हणून गणले जाते. जीक्यूजी फर्मला वाटते की आम्ही ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपन्या भविष्यात दिर्घकाळासाठी विकास करतील आणि मोठ्या होतील यामुळे आम्ही यामध्ये गुंतवणूक करुन समाधानी आहोत. हे प्रयत्न भारतातील अर्थव्यवस्थेला आणि येथील उर्जेला पुढे घेऊन जाण्यासा मदत करतील.

अधिक वाचा :

Back to top button