Weather Forecast : ४ ते ६ मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता | पुढारी

Weather Forecast : ४ ते ६ मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी गारवा तर दुपारनंतर उन्हाच्या झळा जाणवत आहेत. काही वेळा उन्हाळा सुरू झाल्याची चाहुल लागल्याचे जाणवते आहे. अशातच महाराष्ट्रात उद्या (दि. ४) शनिवारपासून अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असून, ६ मार्चपर्यंत अशी परिस्थिती असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Weather Forecast)

उत्तर-दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण मध्य प्रदेशमध्येही ४ ते ६ जानेवारी दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भावर कमी दाबाचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार असून, याठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे हवमान विभागाने सांगितले आहे.

४ ते ५ मार्चमध्ये पश्चिम मध्य प्रदेश, ५ ते ६ मार्चला पूर्व मध्य प्रदेश तर ६ मार्च रोजी विदर्भात गडगडांसह पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Forecast)

हेही वाचा:

Back to top button