Haryana : टॅक्टरची बसला धडक; भीषण अपघातात ८ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा राज्यातील अंबाला येथील राष्ट्रीय महामार्ग ३४४ वर भीषण अपघात. यमुनानगर भागातील काकड माजरा गावाजवळील हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, जागीच आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (दि.३) पहाटे चारच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस बरेलीहून कडून हिमाचल प्रदेशातील बड्डीच्यी दिशेने जात होती. बसमध्ये एकुण ७० प्रवासी होते. (Haryana)
मिळालेल्या माहितीनूसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रॉलीने धडक दिली. ट्रॉलीमध्ये लोकंडी पत्रे ठेवण्यात आली होते. बसमध्ये एकुण ७० प्रवासी होते. हा अपघात एवढा भीषण होता की, जागीट आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आठजण मृत्यू झालेले त्यापैकी सहाजणांचा मृतदेह नारायणगड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तर दोन मृतदेह पंचकुला रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा
- Adani-Hindenburg row | सत्याचा विजय होईल, हिंडेनबर्ग प्रकरणी SC च्या निर्णयाचे अदानींकडून स्वागत
- Meghalaya Election Result 2023 : मेघालयमध्ये कॉनराड संगमा यांचा ‘एनपीपी’ ठरला सर्वात मोठा पक्ष
- G-20 : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य; दिल्लीतील जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा नारा