Latest
Meghalaya Election Result 2023 : मेघालयमध्ये कॉनराड संगमा यांचा ‘एनपीपी’ ठरला सर्वात मोठा पक्ष
पुढारी ऑनलाईन डेस्क : मेघालय विधानसभा २०२३ निवडणुकीत मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचा एनपीपी हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. २७ फेब्रुवारीला झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज (दि. २ मार्च) सायंकाळी ७ वाजेपर्यंत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मतमोजणीमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीने (National People's Party) एकूण २६ पैकी २६ जागांवर विजय मिळवला आहे.
मेघालयात ६० विधानसभा मतदारसंघातील ५९ जागांसाठी मतदान झाले होते. २१.६ लाख मतदारांपैकी ८५.२५ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मेघालयात १३ ठिकाणी (१२ जिल्हा मुख्यालय आणि १ उप विभाग) कडक सुरक्षेसह मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीत पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरू झाली. या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी), कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात मोठी स्पर्धा होती.
हेही वाचा

