नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणी व्यापाऱ्यास अटक | पुढारी

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणी व्यापाऱ्यास अटक

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अमनदीप धल नावाच्या व्यापाऱ्यास सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. धल हा ब्रिडको सेल्स प्रा. लि. नावाची कंपनी चालवितो. हवाला प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार त्याला अटक करण्यात आली असल्याचे ईडी सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (New Delhi)

मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या अनुषंगाने अलिकडेच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. मद्य धोरण ठरविण्यात आप नेता विजय नायर, मनोज राय, अमनदीप धल आणि समीर महेंद्रू यांचा सक्रिय सहभाग होता, असे सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर धल याला ईडीने अटक केली आहे. ईडीने न्यायालयात आतापर्यंत दोन दोषारोपपत्र दाखल केले असून दहाजणांना अटक केलेली आहे.

हेही वाचा

Back to top button