पुढारी ऑनलाईन : (Benefits of Sprouts) – कडधान्य खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ञ देतात. पण फक्त कडधान्य शिजवून खाण्यापेक्षा जर मोड आलेल्या कडधान्यांचा आहार समावेश केला तर कडधान्यांचे पोषणमूल्य अनेक पटींने वाढते. मोड आलेल्या कडधान्यांत प्रोटिन चांगल्या प्रमाणात असतात, पण त्याच जोडीने कॅलरी कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाणे उपयुक्त ठरते.
Netmeds या वेबसाईटवर देण्यात आलेले मोड आलेल्या कडधान्यांचे काही महत्त्वाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
१. कमी कॅलरी आणि जास्त प्रोटीन Benefits of Sprouts
एक मोठी वाटी मोड आलेले कडधान्य आपल्याला १४ ग्रॅम प्रोटीन देतात, तसेच यात कॅलरी फक्त १०० इतक्याच असतात. त्यामुळे भुकेवर नियंत्रण ठेऊन, वजन कमी करण्यासाठी मोड आलेले कडधान्य नेहमी आहारात असावेत.
मोड आलेल्या कडधान्यांत भरपूर फायबर असतात. पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी फायबर उपयुक्त असतात. डायबेटिज असेल किंवा बद्धकोष्टतेचा त्रास होत असेल तर मोड आलेले कडधान्य आहारात असणे आवश्यक आहे.
मोड आलेल्या कडधान्यांत अत्यल्प म्हणजे ०.३८ इतके कमी फॅटस असतात. फायबर जास्त असल्याने आणि फॅटस कमी असल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत होते.
मोड आलेल्या कडधान्यांत क्लोरोफिल असते, त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच मोड आलेल्या कडधान्यांत असलेल्या काही रासायनिक घटकांमुळे पचनक्रिया सुधारते.
मोड आलेल्या कडधान्यांत व्हिटॅमिन A मोठ्या प्रमाणावर असते, त्याचा फायदा डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. याशिवाय व्हिटॅमिन C मुळे केस चांगले राहातात.
१. पचनाला हलके
२. कडधान्यांपेक्षा मोड आलेल्या कडधान्यांत व्हिटॅमिन आणि मिनरल जास्त असतात. व्हिटॅमिन A दुप्पट तर B कॉम्प्लेक्स ५ ते १० पट वाढते.
३. मोड आलेल्या कडधान्यांतील प्रोटीन सहज पचते. मोड आलेली कडधान्य शिजण्यासाठीही सोपी असतात, तसेच पचनासाठी हलकी असतात. मटकी, मूग, चणा, काळे वाटाणे, हिरवा वाटाणा, चवळी अशा किती तरी कडधान्यांचा समावेश आपण आहारात करतो. त्याचा जर मोड आणून वापर केला तर नक्कीच आरोग्यासाठी त्याचा जास्त फायदा होतो.
हेही वाचा