अतिक अहमदने मागितले सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण | पुढारी

अतिक अहमदने मागितले सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी आणि समाजवादी पक्षाचा माजी नेता अतिक अहमद याने उत्तर प्रदेश पोलीस आपणास इन्काउंटरमध्ये ठार मारतील, अशी भीती व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाकडे संरक्षण मागितले आहे.
उमेश पाल हत्या प्रकरणी आपल्या कुटुंबाला मुद्दामहून गुंतवण्यात आले आहे, असा दावाही अतिकने याचिकेत केला आहे. अतिक हा सध्या अहमदाबाद मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. उत्तर प्रदेश पोलीस रिमांड घेऊन आपणास अहमदाबादहून प्रयागराजला नेऊ शकतात आणि तसे करताना वाटेत आपल्याला मारले जाऊ शकते, असेही अतिक याने म्हटले आहे.
हेही वाचा  

Back to top button