Twitter Down : ट्विटर लॉगिन करण्यात समस्या; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त | पुढारी

Twitter Down : ट्विटर लॉगिन करण्यात समस्या; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील काही देशांमध्ये आज (बुधवारी (दि.१) ट्वीटर डाऊन झाले आहे. अनेक यूजर्सला आपले अकाउंटला लॉगिन करण्यात समस्या येत आहेत. तर काहींना स्क्रोल करताना एकही ट्वीट दिसत नाहीये. दरम्यान, लॉगिन करण्यात समस्या येत असल्याने नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ट्वीटर डाऊन झाल्याने लोकांकडून सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर #TwitterDown असा ट्रेंड चालवला जात आहे.

सातत्याने लोकांकडून #TwitterDown असे ट्वीट केले जात असल्याने लोकांकडून याबाबत अनेक ट्वीटही केले जात आहेत. Downdetector या संस्थेला जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणार्‍या आउटजेसवर लक्ष ठेवणारी एक संस्था म्हणून ओळखले जाते. बुधवारी सकाळपासून ट्विटरवर लॉग इन करण्यात वापरकर्त्यांना समस्या येत आहेत.

हेही वाचंलत का?

 

Back to top button