Sanjay Raut vs Bacchu Kadu : “निष्ठेच्या नावाखाली तुम्ही बेवफाई केली”; संजय राऊतांचा बच्चू कडुंवर निशाणा | पुढारी

Sanjay Raut vs Bacchu Kadu : "निष्ठेच्या नावाखाली तुम्ही बेवफाई केली"; संजय राऊतांचा बच्चू कडुंवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कायम होत आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. त्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडूही (Bacchu kadu) शिंदे गटात केले. शिंदे गटाच्या बंडानंतर जनतेतून नेत्यांविरोधात वारंवार नाराजी व्यक्त होत आली आहे. काल (दि.२८) एका वृध्द शेतकऱ्याने बच्चू कडू यांची आडवून काही प्रश्न उपस्थित करत हे वागणं येग्य नाही असं सांगितलं हा व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरलं होत आहे. हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी शेअर करत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “निष्ठेच्या नावाखाली तुम्ही बेवफाई केली. अविश्वासाचा आरोप सहन करत आम्ही प्रामाणिक  आहोत. असं लिहित बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Sanjay Raut vs Bacchu Kadu)

Sanjay Raut vs Bacchu Kadu : तुम्ही डाकूंसोबत गेलात

प्रहारचे आमदार बच्चू कडू हे काल (दि.२८) धाराशिव येथे कोर्टाच्या तारखेसाठी आले होते. त्यांच्या कामानंतर ते चालले असता त्यांना कोर्टाच्या आवारात शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. यावेळी एका वृध्द शेतकऱ्याने त्यांना काही प्रश्न उपस्थित करत जाब विचारला. त्यानंतर बच्चू कडू यांनी मौन बाळगून गाडीत जावून बसले. वृद्ध शेतकऱ्याने गाडी आडवत पुन्हा जाब विचारला.” तुम्ही डाकूंसोबत गेलात. लोकशाही टिकवा. जनतेला का त्रास देत आहात.” अशी विचारणा केली. माध्यमांनी आक्रमक होण्याच कारण विचारल असता ते म्हणाले, बच्चू कडूंना ज्या धोरणानं, ज्या आशेनं निवडून दिलं तसं ते वागत नाहीत. बच्चू कडू महाडाकु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसोबत गेले.

आज (दि.१ मार्च) खासदार संजय राऊत यांनी वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करत ट्विट केलं आहे. हे ट्विट त्यांनी हिंदीमधून केले आहे, त्याचा आशय असा की,” निष्ठेच्या नावाखाली तुम्ही बेवफाई केली. अविश्वासाचा आरोप सहन करत आम्ही विश्वासू राहिलो. तुम्ही आमचं सर्व काही हिरावून घेवून नजरेला नजर भिडवू शकत नाही. आम्ही सर्व काही सोडूनही आम्ही ताठ मानेने चालू शकतो.”

Back to top button