संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव,आदित्य ठाकरेंचे फोटो हटवले! उद्धव ठाकरेंऐवजी स्व.आनंद दिघे यांचा फोटो | पुढारी

संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव,आदित्य ठाकरेंचे फोटो हटवले! उद्धव ठाकरेंऐवजी स्व.आनंद दिघे यांचा फोटो

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा- राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत निर्माण झालेल्या गटबाजीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्‍वाचा निकाल सुनावल्यानंतर शिवसेनेनी ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या दोघांच्या फोटोऐवजी आता शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

उद्धव यांच्या फोटोच्या जागी दिघे यांचा तर आदित्य यांच्या फोटोच्या जागी मुख्यमंत्री शिंदेंचा फोटा लावण्यात आल्याचे दिसून आले. राज्यातील विधिमंडळातील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे आल्यानंतर आता संसदेतील शिवसेनेचे कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. ठाकरे गटाने केलेल्या संसदेतील नियुक्त्यांना देखील रद्दबातल करण्यात आले आहे. संसदेतील शिवसेना खासदारांवर आता शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांचा व्हिप लागू होईल.

याआधी मुख्यनेतेपदी संजर राऊत होते; पंरतु आता हे पद गजानन किर्तीकर यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संसदेतील शिवसेना कार्यालयात आता बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button