भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल : पंतप्रधान मोदी | पुढारी

भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात तंत्रज्ञान महत्त्‍वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. २८ ) व्‍यक्‍त केला. केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्यांवर मोदी मागील काही दिवसांपासून वेबिनार घेत आहेत.

या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, “तळागाळातील लोकांपर्यंत डिजिटल क्रांतीचा फायदा पोहोचावा, याकरिता व्यापक प्रमाणात आधुनिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आले आहे. छोट्या उद्योगांना कमीतकमी अडथळ्यांशिवाय कामकाज करता यावे, यासाठी किचकट व बिनकामी नियम रद्दबातल करण्यात आले आहेत. जे नियम बदलता येणे शक्य आहेत, त्यांची माहिती देण्यासही उद्योग क्षेत्राला सांगण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास ४० हजार किचकट नियम काढून टाकण्यात आले आहेत.”

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ आणि 5 जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कृषी, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांचा कायापालट करता येणे शक्य आहे. ‘एआय’ चा वापर करून सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील दहा कोणते प्रमुख अडथळे दूर करता येतील, याबाबतची विचारणा तज्ज्ञांना करण्यात आली आहे. शिवाय कर प्रणालीमध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर केला जात आहे. करदात्यांसमोरील असंख्य अडथळे यामुळे दूर झाले आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button