मद्य घोटाळाप्रकरण : मनीष सिसोदिया यांची अटकेविरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव | पुढारी

मद्य घोटाळाप्रकरण : मनीष सिसोदिया यांची अटकेविरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मद्य घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्‍या कारवाईविरोधात आज ( दि. २८ ) दिल्‍लीचे उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. त्‍यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांच्‍या खंडपीठासमोर आज दुपारी ३.५० वाजता सुनावणी होणार आहे.

रविवार, २६ रोजी तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय गुन्हे अन्वेशन (सीबीआय) विभागाने मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. सोमवारी त्‍यांना सीबीआय विशेष न्‍यायालयात दाखल करण्‍यात आले. यावेळी त्‍यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्‍यात आली आहे. सीबीआयच्‍या अटक कारवाईविरोधात आपने देशभरात विविध ठिकाणी निदर्शने केली. आता सिसोदिया यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवरील सुनावणीकडे आप नेत्‍यांचे लक्ष लागले आहे.

नायब राज्‍यपाल व्हीके सक्सेनांनी केली होती सीबीआय चौकशीची शिफारस

दिल्‍लीतील नवीन मद्य धोरणातील भ्रष्‍टाचार प्रकरणी जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला होता.

हेही वाचा : 

 

Back to top button