

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. डीजीपी दिलबाग सिंग यांनी चकमकीची पुष्टी केली. मात्र दहशतवाद्यांची ओळख उघड केलेली नाही. ठार झालेल्या दहशतवाद्याचा काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत हात असण्याची शक्यता आहे, अशी महिती सुत्रांनी दिली आहे. तसेच यात लष्कराचे दोन जवान देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पुलवामा येथे रविवारी (दि.२६) पत्नीसह बाजारात जाणारे काश्मिरी पंडित बँक गार्ड संजय शर्मा यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मारेकरी पडगामपोरा येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. हल्ला झाल्यापासून पोलिस आणि सुरक्षा दलांचे पथक सतत मारेकऱ्यांच्या शोधात आहेत. यादरम्यान सोमवारी मध्यरात्री अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पण दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.
हेही वाचा :