Russia-Ukarine War : पुतीन यांची हत्या त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच होईल – झेलन्स्की | पुढारी

Russia-Ukarine War : पुतीन यांची हत्या त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच होईल - झेलन्स्की

कीव (युक्रेन); पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची त्यांच्याच लोकांकडून हत्या केली जाईल, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, पुतिन एके दिवशी त्यांच्याच वर्तुळातील लोकांकडून मारले जातील. न्यूजवीक मधील एका वृत्तानुसार, झेलन्स्की यांनी केलेले वक्तव्य ‘इअर’ नावाच्या युक्रेनियन माहितीपटाचा भाग आहे. न्यूज वीकने पुढे सांगितले की रशिया-युक्रेन युद्धावर आधारित माहितीपट शुक्रवारी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला. डॉक्युमेंटरीमध्ये, झेलेन्स्की म्हणाले की रशियन अध्यक्षांच्या नेतृत्वाच्या काळात एक असा काळ येईल जिथे त्यांचे जवळचे मित्रच त्यांच्या विरोधात कारवाई करतील. (Russia-Ukarine War)

न्यूजवीकच्या मते, युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले, “एक क्षण नक्कीच येईल जेव्हा पुतिनच्या राजवटीची क्रूरता रशियामध्ये जाणवेल त्यांनतर त्यांच्यातील लोक पुतीनची हत्या करतील. त्यानंतर त्याला मारण्याचे कारण शोधतील आणि या माझ्या वाक्यांना देखील लक्षात ठेवले जाईल. (Russia-Ukarine War)

पुतीन यांच्या जवळचे लोकच त्यांच्यावर नाराज (Russia-Ukarine War)

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या अंतर्गत वर्तुळात असंतोष असल्याबद्दलच्या बातम्या येत असताना झेलन्स्की यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने अलीकडेच म्हटले आहे की रशियन राष्ट्राध्यक्षांचे जवळचे मित्र त्यांच्याबाबत निराश आहेत, कारण युद्धभूमीवरील रशियाचे सैनिक अनेक व्हिडिओंमध्ये तक्रार करताना आणि रडताना दिसत आहेत.

मात्र, अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या चांगल्या स्थितीचे श्रेय पुतीन यांना देतात त्यामुळे अशी परिस्थिती समोर येईल यांच्या शक्यता कमीच वाटते. व्लादिमीर झेलन्स्की यांनी रविवारी (दि.२६) सांगितले की, क्रिमियन द्वीपकल्प युक्रेनियनांच्या जेव्हा नियंत्रणात येईल तो युद्धाच्या समाप्तीचा भाग असेल. “ही आमची जमीन, आमचे लोक आणि आमचा इतिहास आहे. आम्ही युक्रेनच्या प्रत्येक कोपऱ्यात युक्रेनचा ध्वज परत करू,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. दरम्यान, झेलेन्स्की यांच्या ताज्या वक्तव्यांवर रशियाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. (Russia-Ukarine War)

झेलेन्स्की यांनी कमांडर मेजर जनरलची केली हकालपट्टी 

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी संयुक्त सैन्याच्या ऑपरेशनचे कमांडर मेजर जनरल एडवर्ड मिखाइलोविच मोस्कालोव्ह यांना काढून टाकले. कीव प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल ॲलेक्झांडर पावल्युक यांची नियुक्ती झाल्यावर मोस्कालोव्ह यांची गेल्या मार्चमध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, झेलेन्स्की यांनी मोस्कालोव्हच्या बडतर्फीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

सीएनएनच्या अहवालानुसार युक्रेनियन अधिकाऱ्यांनी देशभरात भ्रष्टाचारा विरोधात मोहीम उघडली आहे. ज्यामुळे ज्यामुळे अनेक हाय-प्रोफाईल अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मोस्कालोव्हच्या बडतर्फीचा भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अधिक वाचा :

Back to top button