देशद्रोह्यांना आजही सावरकरांची भीती वाटते : सुनील देवधर

देशद्रोह्यांना आजही सावरकरांची भीती वाटते : सुनील देवधर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजच्या काळातीत आहेत. त्यामुळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच काही देशद्रोह्यांच्या फोरमला त्यांची भीती वाटते, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आज (दि.२६) येथे केली. "माय होम इंडिया" संस्थेचे संस्थापक असलेल्या देवधर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त 'कालजयी सावरकर' हा चरित्रपट प्रदर्शित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

सावरकरांचे विचार आजही पथदर्शी आहेत. त्यांनी सशस्त्र क्रांतीची ज्वाला भारतीयांमध्ये निर्माण केली. त्यामुळे त्यांचे विचार आणि तत्वज्ञान हे देशवासियांना सदैव चेतना देत राहतील, असे देवधर यांनी म्हटले आहे. सावरकरांच्या विचारांची भीती ब्रिटिशांना होती. हीच भीती आज देशद्रोह्यांना आहे. त्यामुळे राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे समर्थक आणि डाव्यांचे फोरम सावरकरांना घाबरतात. सावरकरांनी देशाला बळकट करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण झाले असून भारत आता बलशाही झाला आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान वीर सावरकर पर्यटन सर्किटची सुरुवात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून केली जात असल्याची माहिती दिलीप करंबळेकर यांनी यावेळी दिली. भगूरमध्ये सावरकर चरित्र थीम पार्क उभारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news