पुढारी ऑनलाईन डेस्क : Petrol Diesel Prices Hike : जागतिक बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत आज म्हणजेच रविवारी कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या नवीनतम दरानुसार, आज डब्ल्यूटीआय क्रूडची प्रति बॅरल 76.32 डॉलर आणि ब्रेंट क्रूडची प्रति बॅरल 83.16 डॉलर किंमत आहे. तथापि, अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमती निश्चितपणे बदलल्या आहेत. देशातील सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती अपडेट करतात, त्यानंतर देशभरात तेलाच्या किमती निश्चित केल्या जातात.
नवीन तेल दर यादीनुसार, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आज (दि. 26) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 89 पैसे आणि 63 पैशांनी वाढल्या आहेत. यासह, हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 21 पैशांची वाढ दिसून आली. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर 97.45 आणि डिझेलचा दर 90.29 रुपयांपर्यंत पोहचला आहे. यानंतर पंजाबचा क्रमांक येतो, जिथे पेट्रोल 97.55 रुपये आणि डिझेल 38 पैशांच्या वाढीसह 87.90 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात पेट्रोल 53 पैशांनी घसरले असून 106.32 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेलच्या दरातही 49 पैशांची घसरण झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. (Petrol Diesel Prices Hike)
तुम्हाला घरी बसून तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाणून घ्यायचे असतील, तर इंडियन ऑइलचे ग्राहक RSP<डीलर कोड> टाइप करून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात. एचपीसीएलचे ग्राहक HPPRICE <डीलर कोड> टाईप करून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून तेलाच्या किमतींची माहिती मिळू शकतता. त्याचप्रमाणे, बीपीसीएल ग्राहक RSP <डीलर कोड> टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून तेलाच्या नवीन दराबाबत अपडेट मिळवू शकतात. (Petrol Diesel Prices Hike)