महाठग सुकेश चंद्रशेखरचा जेलमधील व्हिडिओ व्हायरल; सापडल्या महागड्या वस्तू | पुढारी

महाठग सुकेश चंद्रशेखरचा जेलमधील व्हिडिओ व्हायरल; सापडल्या महागड्या वस्तू

पुढारी ऑनलाईन : हाय-प्रोफाइल लोक आणि सेलिब्रिटींकडून पैसे उकळल्याप्रकरणातील आरोपी चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. दरम्यान, तुरूंगात सर्व सुखसुविधा उपभोगणारा एक व्हिडिओ लिक झाला आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखर याच्या जेलमधील खोलीत महागड्या वस्तू दिसत आहेत. ज्यामध्ये गुच्ची चप्पल आणि ८० हजार रुपये किमतीच्या दोन जीन्स आणि १.५ लाख रूपये रोख रकमेचा समावेश आहे.

सुकेशचे जेल सेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यानंतर बुधवारी (दि.२२) त्याच्या खोलीवर अचानक टाकलेल्या छाप्यात अधिकाऱ्यांनी सुकेश याच्याकडून अनेक महागड्या वस्तू आणि रोख रक्कम जप्त केल्या आहेत. दरम्यान, सुकेश चंद्रशेखर हा या व्हिडिओमध्ये रडताना दिसत आहे. यानंतर सुकेश सीसीटीव्ही फुटेज लीक करणाऱ्या व्यक्तीवर जेल प्राधिकरण चौकशी करून कारवाई करेल; असे देखील येथील तुरुंग अधिकाऱ्याने या घटनेवर बोलताना सांगितले आहे.

सुकेशला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉंड्रिंगच्या एका नवीन प्रकरणात नुकतीच अटक केली आहे. हे प्रकरण रेलिगेअरचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंग यांच्या पत्नीविरुद्ध केलेल्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. चंद्रशेखर यांच्यावरील नवीन आरोप म्हणजे 3.5 कोटी रुपयांशी संबंधित आहे. जे मालविंदर सिंग यांच्या पत्नी जपना यांनी पतीला जामीन देण्यासाठी हे पैसे वापरण्यात येतील असे सांगितल्यानंतर सुकेश याला दिले होते. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) दिल्ली न्यायालयाने त्याला ईडी कोठडी सुनावली आहे.

तसेच २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील प्रमुख संशयित सुकेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांना देखील तिहार तुरुंगात असतानाही फसवण्याचे प्लॅनिंग केले होते. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या या प्रकरणात गुंतलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे.

हेही वाचा:

Back to top button